वैशिष्ट्ये विहंगावलोकन
Google इनपुट साधने आपल्याला आपल्या इच्छित भाषेत अधिक सहजपणे टाइप करण्यास मदत करू शकतात. आम्ही सध्या अनेक प्रकारची मजकूर इनपुट साधने प्रदान करतो:
- IME (इनपुट पद्धत संपादक) एक रूपांतरण इंजिन वापरून आपले कीस्ट्रोक अन्य भाषेत नकाशेबद्ध करते.
- लिप्यंतरण एका भाषेतून ज्याचे ध्वनी सर्वोत्कृष्टरित्या जुळतात त्या दुसर्या भाषेत मजकूराचे ध्वनी/ध्वन्यात्मक रूपांतरीत करते. उदाहरणार्थ, लिप्यंतरण “namaste” ला हिंदीमध्ये “नमस्ते” असे रूपांतरित करते.
- व्हर्चुअल कीबोर्ड आपल्या स्क्रीनवर एक कीबोर्ड प्रदर्शित करतो जो आपल्या मूळ कीबोर्डवरील की नकाशेबद्ध करतो. आपण स्क्रिन-वरील कीबोर्ड मांडणीच्या आधारावर थेट अन्य भाषेत टाइप करू शकता.
- हस्ताक्षर आपल्याला आपल्या बोटाने वर्ण गिरवून मजकूर टाइप करू देते. सध्या, हस्ताक्षर केवळ Google इनपुट साधने Chrome विस्तार वर उपलब्ध आहे.
Google खाते सेटिंग्जमध्ये इनपुट साधने कशी कॉन्फिगर करावी हे जाणून घ्या.
Gmail, ड्राइव्ह, शोध, भाषांतर, Chrome आणि ChromeOS सह Google उत्पादनांमध्ये इनपुट साधने कशी वापरावी हे जाणून घ्या.
हे वापरून पाहण्यासाठी, केवळ आमच्या डेमो पृष्ठ वर जा.