हस्ताक्षर

हस्ताक्षर इनपुट आपल्याला शब्द थेट माउस किंवा ट्रॅकपॅडसह लिहू देते. हस्ताक्षर 50 पेक्षा जास्त भाषांना समर्थन देते.

हस्ताक्षर इनपुट वापरण्यासाठी, प्रथम चरण हे इनपुट साधनांना सक्षम करणे आहे. शोध, Gmail, Google ड्राइव्ह, Youtube, भाषांतर, Chrome आणि Chrome OS मध्ये इनपुट साधने सक्षम करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करा. काही भाषांचे हस्ताक्षर इनपुट वरील काही उत्पादनांमध्ये अनुपलब्ध असू शकते हे लक्षात ठेवा.

Google इनपुट साधने Chrome विस्तार मध्ये हस्ताक्षर इनपुट कसे वापरावे हे जाणून घेण्यासाठी हा ट्यूटोरियल व्हिडिओ पहा.

एका पेन्सिल द्वारे हस्ताक्षर इनपुट दर्शवले जाते.हस्ताक्षर इनपुट वापरताना, हस्ताक्षर पॅनेलवर आपले ट्रॅकपॅड/माउस हलवा. वर्ण रेखांकित करण्यासाठी ट्रॅकपॅड/माउस दाबून ठेवा. आपले हस्ताक्षर मॅपिंग करणारे विकल्प वर्ण प्रदर्शित होतील. वर्णावर क्लिक करून एक विकल्प निवडा किंवा प्रथम विकल्प निवडण्यासाठी ENTER किंवा SPACE की दाबा.