लिप्यंतरण

लिप्यंतरण 20 पेक्षा जास्त भाषांना समर्थन करते. लिप्यंतरण काय आहे आणि ते कसे वापरावे हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा. हे ऑनलाइन देखील वापरून पहा.

लिप्यंतरण ध्वन्यात्मक समानतेवर आधारित असलेल्या लिहिण्याच्या एका सिस्टीमवरून दुसरीवर मॅपिंग करण्याच्या पद्धतीचा संदर्भ घेते. या साधनासह, आपण लॅटिन अक्षरांमध्ये टाइप करू शकता (उदा. a, b, c इ), जी लक्ष्य भाषेमध्ये समान उच्चार असलेल्या वर्णांमध्ये रुपांतरित केली जातात. उदाहरणार्थ, हिंदी लिप्यंतरणामध्ये, "नमस्ते" मिळण्यासाठी आपण "namaste" टाइप करू शकता, ज्याचा ध्वनी "नमस्ते" सारखा आहे. आपल्या निवडण्यासाठी वैकल्पिक लिप्यंतरणांची एक सूची दर्शविली जाऊ शकते. लक्षात ठेवा की “लिप्यंतरण” हे “भाषांतर” पेक्षा वेगळे आहे: रुपांतरण हे उच्चारावर आधारित आहे, अर्थावर नाही.

लिप्यंतरण अस्पष्ट ध्वन्यात्मक मॅपिंगचे समर्थन करते. आपण लॅटिन अक्षरांमध्ये उच्चारांचा आपला सर्वोत्कृष्ट अंदाज टाइप करा आणि सर्वोत्कृष्ट सूचनांसह लिप्यंतरण ते जुळवेल. उदाहरणार्थ, "namaste" आणि "nemaste" दोन्ही विकल्प म्हणून "नमस्ते" मध्ये रुपांतरित केले जाईल.

लिप्यंतरण वापरण्यासाठी, प्रथम चरण हे इनपुट साधने सक्षम करणे आहे. शोध, Gmail, Google ड्राइव्ह, Youtube, भाषांतर, Chrome आणि Chrome OS मध्ये इनपुट साधने सक्षम करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करा.

सारख्या, भाषेतील वर्णाद्वारे लिप्यंतरण दर्शवण्यात आले आहे. वर्तमान लिप्यंतरण टॉगल करणे चालू/बंद करण्यासाठी चिन्हावर क्लिक करणे किंवा दुसरे इनपुट साधन निवडण्यासाठी त्याच्या पुढील बाणावर क्लिक करणे. जेव्हा लिप्यंतरण टॉगल करुन चालू केले जाते, तेव्हा बटण गडद राखाडी होते.

लिप्यंतरण वापरत असताना, लॅटिन वर्णांमध्ये ध्वन्यात्मक शब्द टाइप करा. जसे आपण टाइप कराल, तसे आपल्याला ध्वन्यात्मक शब्दलेखन मॅप करण्यासाठी उमेदवाराच्या शब्दाची एक सूची दिसेल. खालीलपैकी कोणत्याही क्रिया करून आपण सूचीतून शब्द निवडू शकता:

  • प्रथम विकल्प निवडण्यासाठी SPACE किंवा ENTER दाबा,
  • एका शब्दावर क्लिक करा,
  • शब्दाच्या पुढे संख्या प्रविष्ट करा,
  • UP/DOWN बाण की सह एका पृष्ठातील विकल्पांची सूची नेव्हिगेट करा. PAGEUP/PAGEDOWN की सह पृष्ठे फ्लिप करा. हायलाइट केलेला शब्द निवडण्यासाठी SPACE किंवा ENTER दाबा